
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क दुप्पट करून 50% केले आहे.
या निर्णयानंतर Amazon, Walmart, Target सारख्या अमेरिकन रिटेल कंपन्यांनी भारतातून येणाऱ्या नवीन ऑर्डर्स थांबवल्या आहेत.
या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Amazon Walmart Halt Orders: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून जाणाऱ्या वस्तूंवरचा आयातकर (टॅरिफ) दुप्पट करून थेट 50 टक्क्यांवर नेला आहे. या निर्णयाचा फटका भारतीय वस्त्रोद्योगाला बसू लागला आहे. Amazon, Walmart, Target आणि Gap यांसारख्या अमेरिकेतील मोठ्या रिटेल कंपन्यांनी भारतातून होणाऱ्या वस्त्र खरेदीच्या ऑर्डर तात्पुरत्या थांबवल्या आहेत. या कंपन्यांनी भारतीय निर्यातदारांना थेट पत्र आणि ईमेल पाठवून सध्याच्या शिपमेंट्स पुढील आदेशापर्यंत रोखण्याची सूचना केली आहे.