Insurance Sector FDI Limit Raised to 100 percent : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विमा क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची (FDI) मर्यादा ७४ टक्क्यांवरून १०० टक्के करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, ही घोषणा केल्यानंतर आता विमा स्वस्त होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.