
Maha Kumbh Mela 2025: कचोरीच्या एका प्लेटची किंमत 30 रुपये आहे. मात्र कचोरी विकण्यासाठी 30 बाय 30 फूट जागेचे एका वर्षाचे भाडे 92 लाख रुपये आहे. प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभसाठी जमिनीचे वाटप सुरू झाले आहे. प्रत्येक दुकानाचे भाडे काही लाखात आहे. ज्यांचे लोकेशन प्राइम आहे त्या दुकानाचे भाडे इतके महाग आहे की छोटे दुकानदार ते विकत घेण्याचा विचारही करू शकत नाहीत.