
UPI Transaction: संपूर्ण भारतात UPI (Unified Payments Interface) व्यवहार आता अधिक जलद होणार आहेत. राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सोमवारी नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे पैसे पाठवणे, शिल्लक तपासणे आणि फेल व्यवहारांची परतफेड ही सर्व प्रक्रिया 10 ते 15 सेकंदांत पूर्ण होणार आहे. याआधी या प्रक्रियेसाठी 30 सेकंद लागत होते.