sakal
NPCI ने 15 सप्टेंबर 2025 पासून UPI ट्रान्झेक्शन मर्यादा वाढवून व्हेरिफाईड व्यापाऱ्यांसाठी दररोज 10 लाखांपर्यंत पेमेंटची सुविधा दिली आहे.
विमा, कर्ज EMI, शेअर बाजार गुंतवणूक, प्रवास, सरकारी देयके यासाठी पूर्वीपेक्षा जास्त मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत.
या बदलांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही आणि याचा फायदा फक्त P2M व्यवहारांसाठीच होईल.
डिजिटल पेमेंट साठी युपीआयचा वापर करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युपीआयच ट्रान्झेक्शन्सची मर्यादा वाढवली आहे. नवीन मर्यादा १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. ज्यांना विमा प्रीमियम, कर्जाचे हप्ते, शेअर बाजार गुंतवणूक, सरकारी शुल्क किंवा मोठी तिकीट बुकिंग यासारखे मोठे ट्रान्झेक्शन दररोज करावे लागते त्यांना याचा फायदा होईल. जर तुम्ही फोन पे, पेटीएम ( Paytm) किंवा गुगल पे (Gpay) सारखे अॅप्स वापरत असाल हा बदल जाणून घ्या.