
UPI Transactions: UPI पेमेंट आता आणखी जलद होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा जलद आणि चांगली करण्यासाठी एक विशेष बदल केला आहे. व्यवहाराची स्थिती तपासण्यासाठी आणि पेमेंट करण्यासाठी लागणारा वेळ सध्याच्या 30 सेकंदांवरून फक्त 15 सेकंदांपर्यंत कमी केला जाणार आहे.