
भारतात १ जुलै २०२५ पासून नेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदलणार आहेत, ज्याचा परिणाम सामान्य माणसापासून ते व्यवसायापर्यंत सर्वांवर होणार आहे. यामध्ये UPI पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तत्काळ ट्रेन तिकीट बुकिंग, जीएसटी रिटर्न आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड यासारख्या बाबींचा समावेश आहे. सरकार आणि संस्था हे नियम लागू करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित करू इच्छितात.