UPI Transaction: लोकांचा ऑनलाइन व्यवहारांवरील विश्वास वाढला, ऑगस्टमध्ये UPI ने केला सर्वोच्च विक्रम

UPI Highest Transaction: गेल्या सात वर्षांतील डिजिटल प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.
UPI Highest Transaction
UPI Highest Transactionsakal

UPI Highest Transaction: भारताने ऑगस्टमध्ये प्रथमच 1 हजार कोटी UPI व्यवहारांचा टप्पा पार करून एक नवीन विक्रम केला आहे. हे व्यवहार 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे आहेत. गेल्या सात वर्षांतील भारताच्या डिजिटल प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.

30 ऑगस्टपर्यंत, 135 कोटी लोकसंख्येच्या देशात UPI द्वारे महिन्याभरात एकूण 1 हजार कोटी व्यवहार डिजिटल पद्धतीने केले गेले, ज्यांचे मूल्य 15 लाख कोटी पेक्षा जास्त आहे, अशी माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने दिली आहे.

35 हून अधिक देशांना आता भारताचे UPI तंत्रज्ञान स्वीकारायचे आहे जेणेकरून ते परदेशात भारतीय लोकांना वापरता येतील. ज्या देशांनी अलीकडेच यूपीआयचा अवलंब करण्यास स्वारस्य दाखवले आहे त्यात जपानचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की तज्ञांचा असा विश्वास आहे की या दराने भारतातील डिजिटल वॉलेट व्यवहार लवकरच रोख व्यवहारांना मागे टाकू शकतात. 2016-17 मध्ये नोटाबंदीमुळे, लोकांनी मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट स्वीकारले आणि रोख पैसे वापरण्याची सवय बंद केली.

UPI Highest Transaction
Rule changes in September: आजपासून देशात होणार हे 6 मोठे बदल, तुमच्या खिशावर असा होणार परिणाम

QR कोडने महत्त्वपूर्ण योगदान दिले

QR सुरू झाल्यानंतर, UPI व्यवहार आणखी वेगाने वाढले आहेत. एका अहवालानुसार, UPI चे 330 लाखाहून अधिक युनिक यूजर्स आहेत आणि सुमारे 70 लाख दुकानदारांनी 356 लाख QR कोड स्वीकारले आहेत. याशिवाय PhonePe, Google Pay, Paytm, Cred आणि Amazon Pay सारख्या UPI अॅप्समुळे व्यवहार वाढले आहेत.

UPI Highest Transaction
Gas Cylinder Price: सणासुदीत सरकारचं आणखी एक गिफ्ट! व्यावसायिक सिलेंडच्या दरात मोठी कपात, किती झाला स्वस्त?

अनेक देशांनी भारताचे UPI स्वीकाराले आहे. आपल्या देशात मोठ्या व्यापाऱ्यांपासून भाजीपाला विकणाऱ्या छोट्या-मध्यम दुकानदारांपर्यंत सगळेच UPI द्वारे व्यवहार करत असल्याने इतर देशांचा त्यात रस वाढला आहे. जपानसह 35 हून अधिक देशांना आता भारताचे UPI तंत्रज्ञान स्वीकारायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com