
Donald Trump Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जवळपास 60 देशांवर 'रिसिप्रोकल टॅरिफ' लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतावर 27 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावले आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी गुरुवारी ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, ही रणनीती अमेरिकेवरच उलटू शकते. त्यांच्या मते, या दराचा भारतावर होणारा परिणाम मर्यादित असेल.