
RBI कडून व्याजदरात कपात होणार की नाही यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद – बहुतेक तज्ज्ञांचा अंदाज आहे की RBI ऑगस्टच्या पॉलिसीमध्ये दर कपात करणार नाही.
महागाई कमी, पण अर्थव्यवस्था मंदावल्याची चिन्हं – उद्योगक्षेत्रात वाढ कमी झाली आहे, कर्ज मागणीही घटलेली आहे.
ऑगस्टमध्ये कपात झाली तर सणासुदीच्या मागणीला बूस्ट – सणांचा हंगाम लवकर सुरू होत असल्याने दर कपात झाली, तर कर्जवाढीसह आर्थिक वाढ होऊ शकते.
RBI Repo Rate: नवीन आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) मॉनेटरी पॉलिसी कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या बैठकीत व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यावेळी RBI व्याजदरात आणखी कपात करेल की थांबेल, यावर अर्थतज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. बहुसंख्य तज्ज्ञांचे मत आहे की, यावेळी RBI काही काळासाठी 'थांबण्याचा' पर्याय निवडू शकते.