
ITC Hotels: 5 फेब्रुवारी रोजी ITC हॉटेल्सचे शेअर्स सेन्सेक्स आणि इतर BSE निर्देशांकांमधून काढून टाकले आहेत. ITC मधून बाहेर पडलेल्या या कंपनीला तात्पुरते सेन्सेक्स आणि इतर काही निर्देशांकांचा एक भाग बनवण्यात आले होते.
जेणेकरून निष्क्रिय फंड त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये पुनर्संतुलन करू शकतील. बीएसईने एका नोटीसमध्ये म्हटले आहे की, ITC हॉटेल्सच्या शेअर्सची स्वतंत्र ट्रेडिंग 29 जानेवारीपासून सुरू झाली होती.
कटऑफ वेळेपर्यंत आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स लोअर सर्किटला स्पर्श करत नव्हते. त्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी कंपनीला सर्व BSE निर्देशांकांमधून काढून टाकण्यात आले. शेअर्सची शेवटची क्लोजिंग किंमत 165 रुपये होती, म्हणजे 4.2%ची घसरण शेअरमध्ये झाली. एकूण 700 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी-विक्री झाली.
एक्स्चेंजमधून डिलिस्टिंग केल्यामुळे इंडेक्स ट्रॅकर्सना सुमारे 400 कोटी रुपयांचे शेअर्स विकावे लागले. निफ्टी इंडेक्समधून ITC हॉटेल्स काढून टाकल्यानंतर 700 कोटी रुपयांची आणखी विक्री होऊ शकते.
ऑक्टोबर-डिसेंबर 2024 मध्ये हॉटेल्स कंपनीचा निव्वळ नफा 74.35 लाख रुपये होता, तर गेल्या वर्षी याच कालावधीत तो 41.68 लाख रुपये होता. संबंधित कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न 163.92 लाख रुपये होते, तर एका वर्षापूर्वी हा आकडा 160.27 लाख रुपये होता.
ITC हॉटेल्सचे शेअर्स 29 जानेवारी रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. हे शेअर बीएसईवर 188 रुपये प्रति शेअरच्या किमतीवर लिस्ट झाले होते, तर एनएसईवर शेअर 180 रुपयांवर लिस्ट झाले होते.
ITC ने आपला हॉटेल व्यवसाय वेगळा केला आहे आणि ITC हॉटेल्स म्हणून नवीन कंपनी स्थापन केली आहे. हे डिमर्जर शेअरधारकांसाठी व्हॅल्यू अनलॉक करण्याच्या उद्देशाने केले गेले आहे. यापूर्वी, 6 जानेवारी 2025 रोजी, NSE आणि BSE ने ITC स्टॉकची किंमत ठरवण्यासाठी विशेष सत्र आयोजित केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.