Vegetable Inflation: भाज्यांच्या वाढत्या महागाईतून कधी होणार सुटका? आरबीआय गव्हर्नर म्हणाले...

Vegetable Inflation: गेल्या दोन महिन्यांत टोमॅटो, कांद्यासह अनेक भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे.
RBI Governor Shaktikanta Das Vegetable prices
RBI Governor Shaktikanta Das Vegetable prices Sakal

Vegetable Inflation: वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे. गेल्या दोन महिन्यांत देशात टोमॅटो, कांद्यासह अनेक भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. अशा स्थितीत महागाईपासून दिलासा कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी सांगितले की, सप्टेंबरपर्यंत भाज्यांच्या किंमतीत मोठी घसरण नोंदवली जाऊ शकते.

महागाईपासून दिलासा मिळेल

एका कार्यक्रमात आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, सरकारने योग्य वेळी हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे देशात अन्नधान्याचा तुटवडा नसून योग्य पुरवठा झाल्यामुळे किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली आहे.

यासोबतच ते म्हणाले की, महागाईचा दर अजूनही अपेक्षेपेक्षा जास्त असला तरी, गेल्या काही महिन्यांपासून अशी चिन्हे दिसू लागली आहेत की, आगामी काळात महागाईपासून दिलासा मिळेल.

RBI गव्हर्नर म्हणाले की, जुलैपासून भारतात भाज्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. टोमॅटोमुळे महागाईच्या दरात कमालीची वाढ झाली आहे, मात्र सरकारने टोमॅटोच्या किंमती योग्य वेळी नियंत्रित करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

यासोबतच मंडईमध्ये टोमॅटोच्या नवीन पिकांची आवक झाल्यामुळे त्याच्या किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याचबरोबर कांद्याची पुरवठा साखळी चांगली ठेवण्यासाठी सातत्याने अनेक पावले उचलली जात आहेत. अशा स्थितीत सप्टेंबरपर्यंत भाजीपाल्याची महागाई कमी होण्याची आशा आहे.

RBI Governor Shaktikanta Das Vegetable prices
Chandrayaan 3 : 'चांद्रयान ३' कडून हे आर्थिक धडे प्रत्येकाने शिकायलाच हवेत!

विशेष म्हणजे, किरकोळ महागाई दरात जुलैमध्ये प्रचंड वाढ नोंदवली गेली आणि ती 7.44 टक्क्यांवर गेल्या 15 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली. जुलै महिन्यात महागाई वाढण्यामागे भाजीपाला हे प्रमुख कारण आहे. भाज्यांच्या गगनाला भिडलेल्या महागाईमुळे देशात किरकोळ महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.

RBI Governor Shaktikanta Das Vegetable prices
Gautam Adani: "ही भारताची वेळ..." चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर गौतम अदानींचे ट्वीट चर्चेत

आरबीआय आवश्यक पावले उचलेल

आरबीआय गव्हर्नर आशावादी आहेत की भाज्यांच्या किंमती घसरल्यानंतर आगामी काळात किरकोळ महागाई दरात कमालीची घट नोंदवली जाऊ शकते आणि तिसऱ्या तिमाहीपर्यंत तो 5.7 टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे.

RBI Governor Shaktikanta Das Vegetable prices
Chandrayaan 3: चंद्रावर फडकला तिरंगा अन् 13 कंपन्यांनी कमावले 20,000 कोटी

त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2024 मध्ये महागाई दर 5.4 टक्के अपेक्षित आहे. यासोबतच शक्तीकांता दास यांनी असेही सांगितले की, सप्टेंबर 2022 पासून आरबीआयने महागाईवर बारीक नजर ठेवली आहे आणि आगामी काळात परिस्थितीनुसार पावले उचलली जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com