
हावेरी जिल्ह्यातील भाजीविक्रेत्याला डिजिटल व्यवहारांमुळे 29 लाखांची जीएसटी नोटीस मिळाली.
ताजी व अप्रक्रियायुक्त भाजीपाला जीएसटीमुक्त असला तरी पॅक, लेबल केलेल्या भाज्यांवर 5-12% कर लागू शकतो.
लहान विक्रेत्यांनी 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास आयकर रिटर्न भरणे बंधनकारक आहे.
GST Notice Over Digital Payments: कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील एका साध्या भाजीविक्रेत्याला तब्बल 29 लाख रुपयांची जीएसटी नोटीस आली आहे. हा विक्रेता आहे शंकरगौडा हडिमाणी, या विक्रेत्याची जीएसटी करदाता म्हणून नोंदणी नाही. तरीही, गेल्या चार वर्षांत त्याच्या यूपीआय आणि डिजिटल पेमेंटद्वारे झालेल्या एकूण 1.63 कोटी रुपयांच्या व्यवहारामुळे कर विभागाने नोटीस पाठवली, अशी माहिती डेक्कन हेराल्डने दिली आहे.