Veg Thali Price: शाकाहारी थाळी झाली महाग; तर मांसाहारी थाळी झाली स्वस्त, काय आहे कारण?

Veg, Non-Veg Thali Price: कांदा आणि टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने फेब्रुवारीमध्ये शाकाहारी थाळी सात टक्क्यांनी महागली आहे. मात्र, चिकनच्या दरात कपात झाल्याने मांसाहारी थाळीचे दर नऊ टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत.
Vegetarian thali becomes more affordable in February, non-veg thali costlier
Vegetarian thali becomes more affordable in February, non-veg thali costlierSakal

Veg, Non-Veg Thali Price (Marathi News): कांदा आणि टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने फेब्रुवारीमध्ये शाकाहारी थाळी सात टक्क्यांनी महागली आहे. मात्र, चिकनच्या दरात कपात झाल्याने मांसाहारी थाळीचे दर नऊ टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत. यापूर्वी जानेवारीमध्येही असाच ट्रेंड होता. (Vegetarian thali becomes more affordable in February, non-veg thali costlier)

क्रिसिल मार्केट इंटेलिजेंस अँड ॲनालिसिसने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, फेब्रुवारीमध्ये पोल्ट्रीच्या किंमतीत घट झाल्यामुळे मांसाहारी थाळी नऊ टक्क्यांनी स्वस्त झाली आहे.

यामध्ये 'व्हेज थाळी' आणि 'नॉन-व्हेज थाळी'ची किंमत शाकाहारी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे मुख्य पदार्थ आणि मांसाहारी पदार्थ बनवताना वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमतीच्या महागाईच्या आधारावर मोजण्यात आल्या आहेत.

Vegetarian thali becomes more affordable in February, non-veg thali costlier
Pratham EPC Projects IPO : प्रथम ईपीसी प्रोजेक्ट्सच्या आयपीओ 11 ते 13 मार्चपर्यंत असणार खुला, अधिक जाणून घेऊया...

क्रिसिलच्या मते, शाकाहारी थाळीची किंमत फेब्रुवारीमध्ये 27.5 रुपयांवर पोहोचली होती, तर एका वर्षापूर्वी ती 25.60 रुपये होती. या काळात कांद्याचे भाव 29 टक्के तर टोमॅटोचे 38 टक्के वाढले आहेत. मात्र, गेल्या महिन्याच्या तुलनेत थाळीच्या किंमतीत किरकोळ घट झाली आहे.

चिकनचे दर 20 टक्क्यांनी कमी झाले

वर्षभरात कोंबडीच्या किंमती 20 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मांसाहारी थाळीच्या खर्चात त्याचे 50 टक्के योगदान आहे. त्यामुळे मांसाहारी थाळी स्वस्त झाली आहे. या वर्षी जानेवारीच्या तुलनेत चिकनचे दर 10 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

Vegetarian thali becomes more affordable in February, non-veg thali costlier
Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट, आयबीए आणि बँक युनियनच्या बैठकीत पगारवाढीला मंजुरी

जानेवारीच्या 28 रुपयांच्या थाळीच्या तुलनेत गेल्या महिन्यात शाकाहारी थाळी स्वस्त झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे मांसाहारी थाळी सुमारे पाच रुपयांनी स्वस्त झाली आहे. गेल्या वर्षी मांसाहारी थाळी 59.2 रुपये होती, तर यंदा ती 54 रुपयांवर आली आहे.

‘ब्रॉयलर’ चिकनचे भाव 20 टक्क्यांनी घसरले आहेत. दरवर्षी मांसाहारी थाळीच्या किंमतीत घट होण्याचे हे प्रमुख कारण आहे. अहवालानुसार, बर्ड फ्लूचा प्रसार झाल्यामुळे पवित्र रमजान महिन्यापूर्वी चिकनचा पुरवठा मर्यादित झाला आहे. तसेच चिकनच्या मागणीत वाढ झाल्याने फेब्रुवारीमध्ये ब्रॉयलरच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Vegetarian thali becomes more affordable in February, non-veg thali costlier
Sam Altman : 'आमचा सॅमवर पूर्ण विश्वास..', अखेर ओपन एआय कंपनीच्या बोर्डावर अल्टमन परतले! चुकीच्या पद्धतीने टाकलं होतं काढून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com