
Warren Buffet Investment: जगातील सर्वात महान गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी सोन्यात गुंतवणूक करण्याचे नेहमीच टाळले आहे. पण गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीबद्दल बफे यांना पश्चाताप होत असावा. 2023 च्या अखेरीपासून सोने ही सर्वात फायदेशीर मालमत्ता असल्याचे सिद्ध झाले आहे. जगभरातील केंद्रीय बँका आणि बडे फंड व्यवस्थापक विक्रमी सोने खरेदी करत आहेत.