
Warren Buffett Names Successor: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या वॉरेन बफे यांनी आपल्या मालमत्तेची विभागणी करण्याचा प्लॅन तयार केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांची सर्व मालमत्ता आता एका चॅरिटेबल ट्रस्टला दिली जाईल, ज्याचे व्यवस्थापन त्यांची मुले सुझी, हॉवी आणि पीटर करतील. याशिवाय त्यांचे पैसे आता बिल गेट्स ट्रस्टला दिले जाणार नाहीत.