
Ban on New India Bank: रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. बँकेतून आता पैसे काढता येणार नाहीत, अशी माहिती कळताच बँकेच्या खातेदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आम्हाला इतर लोन्सचे EMI भरायचेत, त्याच आता काय होणार? असा सवालही या ग्राहकांनी केला आहे.