
थोडक्यात:
भारत-अमेरिका व्यापार करारात 'नॉन-व्हेज दूध' सर्वात मोठा वादग्रस्त मुद्दा ठरत आहे.
भारत अशा गायींच्या दुधाच्या आयातीला विरोध करतो, ज्या मांसाहारी आहार घेतात.
शेतकरी, संस्कृती आणि श्रद्धा लक्षात घेता भारत यावर कोणतीही तडजोड करायला तयार नाही.
Non Veg Milk: भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी कराराला अंतिम रूप देण्याची तयारी सुरू आहे. मात्र या वाटाघाटींमध्ये सर्वात मोठा अडथळा ठरत आहे तो म्हणजे डेअरी आणि कृषी क्षेत्र. विशेषतः 'नॉन-व्हेज दूध' या मुद्यावरून भारताने आपली भूमिका स्पष्ट करत हे क्षेत्र अमेरिकेसाठी न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.