
Raghuram Rajan Redistributive Wealth Tax: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी भारतात "संपत्ती कर" (Wealth Tax) लावण्याच्या कल्पनेवर थेट आक्षेप घेतला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, खूप श्रीमंत लोक हे कायदेशीर मार्गाने असे कर टाळतात आणि त्यामुळे अशा करांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होऊ शकत नाही.