
Subhanshu Shukla Spacecraft Price: भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून अंतराळाकडे रवाना झाले आहेत. एक्सिओम मिशन 4 अंतर्गत हे यान अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून सोडण्यात आले आहे. या मोहिमेत शुभांशुंसोबत अमेरिका, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीरही सहभागी झाले आहेत. उद्या हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचणार आहे.