
डीमार्टमध्ये ग्राहक बनून काही जण चोरी करत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.
ट्रायल रूममध्ये चॉकलेट खाणे, महागड्या वस्तू लपवणे हे प्रकार वाढले आहेत.
या चोरींमुळे डीमार्टला दररोज 5,000 ते 10,000 रुपयांचा तोटा होत आहे.
Dmart Thefts: शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या डीमार्टमध्ये आता नव्या पद्धतीच्या चोरीचे प्रकार समोर येत आहेत. काही ग्राहक खरेदीसाठी न येता चोरी करण्यासाठी स्टोअरमध्ये येतात. डीमार्टच्या वेगवेगळ्या फ्लोअरवर ठेवलेली महागडी चॉकलेट्स, स्नॅक्स, परफ्यूम्स आणि छोटे इलेक्ट्रॉनिक आयटम्स चोरी करत आहेत.
कपडे ट्राय करण्याच्या बहाण्याने ट्रायल रूममध्ये जाऊन काहीजण महागडे चॉकलेट्स खातात. ट्रायल रूममध्ये सीसीटीव्ही नसल्याने हे प्रकार उघडकीस येत नाहीत.