
भारतातील घरगुती बचत कमी होत चालली असली तरी देशाचे प्रमुख नेते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पारंपरिक योजना जसे की FD व NSC मध्ये गुंतवणूक करतात.
अमित शाह, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह हे शेअर बाजार, म्युच्युअल फंड, जमीन आणि सोन्याकडे आहे.
PM Modi Investment Portfolio: भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या बचतीत मागील काही वर्षांत घट झाल्याचं चित्र आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये देशाची बचत (Gross Domestic Savings) जीडीपीच्या फक्त 30.7% वर आली आहे, जी 2015 मध्ये 32.2% होती. ही घसरण म्हणजे देशातील सामान्य माणसाची बचत कमी होणं.