
Nikhil Kamath On AI and Jobs: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक नोकऱ्या जात आहेत. यातच झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी “पुढील दहा वर्षांत कोणत्या नोकऱ्या निर्माण होतील?” याबाबतचे मत त्यांनी सोशल मीडियावर मांडले आहे. त्यांनी सांगितलं की, पारंपरिक पद्धतीचं चार वर्षांचं कॉलेज शिक्षण आता जुनं झालं असून, आयुष्यभर शिकत राहणं ही आता काळाची गरज बनली आहे.