Who is Satoshi NakamotoSakal
Personal Finance
Who Is Satoshi Nakamoto: बिल गेट्सपेक्षा श्रीमंत आहे बिटकॉइनचा गूढ निर्माता; बनला जगातील 11वा श्रीमंत व्यक्ती
Who Is Satoshi Nakamoto: 2008 मध्ये बिटकॉइनचा व्हाईट पेपर प्रकाशित करणारा आणि 2009 मध्ये पहिला बिटकॉइन ब्लॉक माइन करणारा हा गूढ व्यक्ती आता जगातील 11वा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
थोडक्यात:
बिटकॉइनचा गूढ निर्माता सातोशी नाकामोटो 128.92 अब्ज डॉलर्स संपत्तीसह जगातील 11वा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.
नाकामोटोची ओळख अजूनही गूढ असून, हॅल फिनीपासून क्रेग राईटपर्यंतच्या दाव्यांना नाकारण्यात आलं आहे.
बिटकॉइन आणि ब्लॉकचेनमुळे क्रिप्टोकरन्सीचे नवे युग सुरू झाले आहे, पण नाकामोटो कोण आहे याचे गुढ अजूनही कायम आहे.
Bitcoin Creator Satoshi Nakamoto: बिटकॉइनचा गूढ निर्माता सातोशी नाकामोटो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2008 मध्ये बिटकॉइनचा व्हाईट पेपर प्रकाशित करणारा आणि 2009 मध्ये पहिला बिटकॉइन ब्लॉक माइन करणारा हा गूढ व्यक्ती आता जगातील 11वा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.