Deepinder Goyal: झोमॅटोचे सीईओ दीपींदर गोयल यांनी मॉडेलशी केले लग्न; कोण आहे शार्क टँक इंडियाच्या जजची पत्नी?

Deepinder Goyal Weds Grecia Munoz: ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोचे सीईओ दीपींदर गोयल यांनी मेक्सिकन मॉडेलशी लग्न केले आहे. दीपींदर गोयल (41) यांनी मेक्सिकन मॉडेल ग्रेशिया मुनोजशी लग्न केले आहे.
Deepinder Goyal Weds Grecia Munoz
Deepinder Goyal Weds Grecia MunozSakal

Deepinder Goyal Weds Grecia Munoz: ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोचे सीईओ दीपींदर गोयल यांनी मेक्सिकन मॉडेलशी लग्न केले आहे. दीपींदर गोयल (41) यांनी मेक्सिकन मॉडेल ग्रेशिया मुनोजशी लग्न केले आहे. गोयल यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न दिल्ली-आयआयटीमधील त्यांची वर्गमैत्रीण कांचन जोशीसोबत झाले होते.

कोण आहे ग्रेशिया मुनोज?

ग्रेशिया मुनोज ही मेक्सिकन मॉडेल आहे. ती एका टेलिव्हिजन शोची होस्टही आहे. याशिवाय मुनोज 2022 मध्ये अमेरिकेतील मेट्रोपॉलिटन फॅशन वीकची विजेता देखील होती.

मॉडेलच्या इंस्टाग्राम बायोनुसार, मुनोजने लिहिले की ती आता भारतात तिच्या घरी आहे. जानेवारीमध्येही मुनोजने सोशल मीडिया अकाऊंटवर भारतातील अनेक फोटो पोस्ट केले होते, ज्यात दिल्लीच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा समावेश होता.

गुरुग्रामस्थित दीपींदर गोयल यांनी 2008 मध्ये कन्सल्टिंग फर्म बेन अँड कंपनीमधील नोकरी सोडल्यानंतर रेस्टॉरंट आणि फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (त्यावेळी Foodiebay.com म्हणून ओळखली जात होती) स्थापना केली.

Deepinder Goyal Weds Grecia Munoz
IPL 2024: टाटा IPLमध्ये पैशांचा पाऊस! JioCinemaची होणार चांदी; कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडणार का?

ब्लिंकिट सुरू करण्याचे श्रेय

अलीकडे झोमॅटोही वादात सापडला होता. कंपनीने शाकाहारी लोकांसाठी शुद्ध शाकाहारी वितरण सेवा सुरू करण्याबाबत माहिती दिली होती. कंपनीच्या या निर्णयामुळे इंटरनेटवर शाकाहार विरुद्ध मांसाहार असा नवा वाद सुरू झाला. झोमॅटो व्यतिरिक्त गोयल यांनी कॉमर्स कंपनी ब्लिंकिट देखील सुरू केली आहे.

झोमॅटोची अशी झाली सुरुवात

InfoEdge चे संस्थापक संजीव बिखचंदानी यांनी 2010 मध्ये या कंपनीत एक दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली होती. इतर अनेक कंपन्यांनीही गुंतवणूक केली होती. एका मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने फूडबेच्या (झोमॅटो त्यावेळी Foodiebay.com म्हणून ओळखली जात होती) शेवटच्या चार शब्दांबाबत कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती.

Deepinder Goyal Weds Grecia Munoz
Semiconductor Stocks : रॉकेटच्या वेगाने धावतायत सेमीकंडक्टर शेअर्स, येत्या काळात मजबूत तेजीचा विश्वास...

त्यानंतर 2010 मध्ये नोटीस मिळाल्यानंतर पाच दिवसांनी फूडबेचे नाव बदलून झोमॅटो करण्यात आले. 2018 मध्ये दीपींदर कंपनीचे सीईओ झाले. आज कंपनी भारत आणि UAE सह अनेक देशांमध्ये व्यवसाय करत आहे. Zomato चे बाजार भांडवल 1.40 लाख कोटी रुपये आहे. तर दीपींदरची एकूण संपत्ती 2570 कोटी रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com