Samosa Singh : नोकरी सोडली, घर विकले आता समोसे विकून रोज कमावतेय 12 लाख, कोण आहे निधी सिंह?

2015 मध्ये लाखो रुपयांची वार्षिक नोकरी सोडून समोसाचा व्यवसाय सुरू केला.
Samosa Singh
Samosa SinghSakal

Samosa Singh : समोसे विकून दररोज 12 लाख रुपये कमावणे यावर आपल्या कोणाचाच विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. निधी सिंग नावाच्या एका महिलीने तिच्या पतीसह दंतकथा वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात आणली आहे.

निधी आणि तिचे पती दोघेही इंजिनियर आहेत, त्यांनी 2015 मध्ये लाखो रुपयांची वार्षिक नोकरी सोडून समोसाचा व्यवसाय सुरू केला. 'समोसा सिंग' या नावाने सुरू झालेला हा स्टार्टअप आता मोठा झाला आहे. (Bengaluru Couple earns Rs 12 lakh per day by selling 'samosas', sold house, left jobs to start business)

गुडगावस्थित बी.टेक पदवीधर निधी सिंग यांनी बंगळुरूमध्ये भारतीय स्नॅक्स समोस्यांचे आउटलेट उघडून जबरदस्त यश मिळवले.

विशेष बाब म्हणजे समोस्यांचा हा स्टार्टअप सुरू करण्यासाठी निधीने वार्षिक 30 लाख रुपयांची नोकरी सोडून समोसा सिंग सुरू केला. चला जाणून घेऊया या तरुण महिला उद्योजकाची रंजक कहाणी.

लाखोंची नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला :

निधी सिंग आणि त्यांचे पती शिखर वीर सिंग हे दोघेही अभियांत्रिकी पदवीधर असून ते बंगळुरूमध्ये राहतात. जेव्हा पती-पत्नी दोघेही त्यांच्या करिअरमध्ये उच्च पदावर होते.

त्यादरम्यान त्यांनी स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 30 लाख रुपये वार्षिक पगार असलेल्या निधी यांनी 2015 मध्ये नोकरी सोडली आणि पुढच्या वर्षी बेंगळुरूमध्ये समोसा सिंग उघडला.

Samosa Singh
Jeet Adani : गौतम अदानींच्या धाकट्या लेकाचा पार पडला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहेत जीत अदानी?

पैशांची गरज असताना 80 लाखांचे घर विकले :

नोकरीदरम्यान मिळालेल्या पैशातून त्यांनी समोसा सिंग आउटलेट सुरू केला. पण जेव्हा त्यांचा व्यवसाय सुरू झाला तेव्हा त्यांना एका मोठ्या स्वयंपाकघराची गरज होती, ज्यासाठी त्यांनी राहणारे अपार्टमेंट 80 लाख रुपयांना विकले. कारण मोठी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती.

शिखर वीर सिंग आणि निधी सिंग यांची भेट हरियाणामध्ये झाली जेव्हा ते बी-टेक करत होते. दोघांनी बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक केले आहे.

दोघेही श्रीमंत पार्श्वभूमीचे आहेत. पती-पत्नी दोघांनाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी मॅजिक ब्रिक्सवरील घर विकले आणि त्या पैशातून त्यांनी बंगळुरूमध्ये कारखाना भाड्याने घेतला.

निधी आणि त्यांच्या पतीचा हा निर्णय चुकीचा ठरला नाही. स्टार्टअपमधील प्रगती इतकी होती की त्यांचा व्यवसाय अनेक पटींनी वाढला. वीकेंडरने अहवाल दिला की ते दर महिन्याला 30,000 समोसे विकतात आणि त्यांची उलाढाल 45 कोटी रुपयांची आहे.

Samosa Singh
हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com