
Who is Radha Vembu Indias Richest Self Made Billionaire: हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 प्रसिद्ध झाली आहे. अनेक श्रीमंत लोकांच्या क्रमवारीत बदल झाला आहे, तर अशी अनेक नावे आहेत ज्यांनी आपल्या संपत्तीत प्रचंड वाढ करून या यादीत प्रवेश मिळवला आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे राधा वेंबू.
भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचे नाव आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून साधे जीवन जगणाऱ्या राधा वेंबू यांची एकूण संपत्ती 47,000 कोटींहून अधिक आहे. त्या बहुराष्ट्रीय टेक फर्म झोहोच्या सह-संस्थापक आहेत.