Tesla’s History Revealed
Tesla’s History RevealedSakal

Tesla: इलॉन मस्क नव्हते टेस्लाचे मालक; कोणी सुरु केली होती कंपनी? जाणून घ्या इतिहास

Tesla Entry In India: 15 जुलै 2025 हा दिवस भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने भारतात अधिकृत एंट्री केली आहे.
Published on

थोडक्यात:

  1. टेस्लाने 15 जुलै 2025 रोजी मुंबईत आपलं पहिलं शोरूम उघडून भारतात अधिकृत एंट्री केली.

  2. टेस्लाची स्थापना इलॉन मस्क यांनी नाही, तर मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टारपेनिंग यांनी 2003 मध्ये केली होती.

  3. टेस्लाच्या भारतातील प्रवेशामुळे EV बाजार, रोजगार आणि उद्योग क्षेत्रात मोठा बदल अपेक्षित आहे.

Tesla Entry In India: 15 जुलै 2025 हा दिवस भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने भारतात अधिकृत एंट्री केली आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे टेस्लाचं पहिलं शोरूम उघडलं गेलं आणि कार बुकिंगला सुरुवात झाली.

टेस्लाची ही एंट्री म्हणजे केवळ एका कार ब्रँडचं आगमन नाही, तर भारतीय ईव्ही मार्केटमधील ही मोठी गुंतवणूक आहे. 1 ट्रिलियन डॉलरहून अधिक मार्केट कॅप असलेल्या या कंपनीचा अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात 55% मार्केट शेअर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com