
Gold Reserve
Sakal
India Joins the Gold Rush: सोनं हे सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक मानलं जातं. युद्ध, आर्थिक संकट किंवा जागतिक अनिश्चितता असली की प्रत्येक देश सोन्यात गुंतवणूक करतो. काही वर्षांपूर्वी 70 हजार रुपयांखाली असणारं एक तोळा सोनं आज सव्वा लाख रुपयांच्या वर गेलं आहे. पण ही वाढ फक्त सामान्य लोकांच्या खरेदीमुळे नाही, तर अनेक देशांच्या सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणावर सोनं साठवत आहेत. आणि यात चीन सर्वात पुढे आहे.