
Gold Rate Today 24 June 2025: मंगळवारी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं 97 हजार रुपयांच्या पातळीवर घसरलं आहे, तर चांदीतही जवळपास 1% घसरण झाली आहे. ही घसरण डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे झाली आहे.
इराण-इस्रायलमधील 12 दिवसांच्या युद्धाला अखेर ब्रेक लागल्याने 'सेफ इन्व्हेस्टमेंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी कमी झाली आहे.