ATM Card: ATM कार्डवर 16 अंकी क्रमांक का लिहिला जातो, त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?

डेबिट कार्डवर म्हणजेच एटीएम कार्डवर 16 अंकी क्रमांक लिहिलेला तुम्ही पाहिला असेल.
Debit Card
Debit Card Sakal

ATM Card: आजच्या काळात यूपीआयने एटीएम कार्डचा वापर मर्यादित केला आहे, पण आजही एटीएम कार्डचे अनेक वापरकर्ते आहेत. तुमच्याकडे एटीएम कार्ड असल्यास, तुम्हाला तुमच्या रोख रकमेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.

तुम्ही जवळपासच्या कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकता. याशिवाय शॉपिंग करताना कार्ड स्वाइप करून तुम्ही सहज पेमेंट करू शकता.

डेबिट कार्डवर म्हणजेच एटीएम कार्डवर 16 अंकी क्रमांक लिहिलेला तुम्ही पाहिला असेल. एटीएममधून व्यवहार करताना तुम्ही अनेक वेळा कार्डचा तपशील भरला असेल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एटीएमवर 16 अंकी क्रमांक का लिहिला जातो? त्याचा अर्थ काय आहेत?

हे 16 अंक तुमच्या कार्डशी संबंधित माहिती तुमच्याकडे ठेवतात. ते तुमच्या कार्डची पडताळणी, सुरक्षा आणि तुमची ओळख यांच्याशी थेट संबंधित आहेत. जेव्हा तुम्ही ऑनलाइन पेमेंट करता तेव्हा या क्रमांकांद्वारे पेमेंट सिस्टमला कळते की कार्ड कोणत्या कंपनीने जारी केले आहे.

Debit Card
Gautam Adani: गौतम अदानींची रेल्वे क्षेत्रात एन्ट्री, अदानी समूह खरेदी करणार 'ट्रेनमॅन' प्लॅटफॉर्म, अशी आहे डील

16 अंकी संख्येचा अर्थ समजून घ्या

- पहिले 6 अंक हे कार्ड कोणत्या कंपनीने जारी केले आहेत ते दाखवतात. याला ओळख क्रमांक म्हणतात. उदाहरणार्थ, मास्टरकार्डसाठी हा क्रमांक 5XXXXX आहे आणि व्हिसा कार्डसाठी हा क्रमांक 4XXXXX आहे.

- सातव्या अंकापासून ते 15व्या अंकापर्यंतचा क्रमांक बँक खात्याशी जोडला जातो. हा बँक खाते क्रमांक नसून तो खात्याशीच जोडलेला दुसरा क्रमांक आहे.

- कोणत्याही कार्डच्या शेवटच्या अंकाला चेकसम अंक म्हणतात. या अंकावरून तुमचे कार्ड वैध आहे की नाही हे कळते. याशिवाय ऑनलाइन पेमेंट करताना तुम्हाला नेहमी CVV विचारला जातो. हा नंबर कधीही कोणत्याही पेमेंट सिस्टममध्ये सेव्ह केला जात नाही.

Debit Card
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com