
Middle Class Earning and Crisis: आजच्या काळात प्रत्येक नोकरदार व्यक्ती महिनाअखेरीस येणाऱ्या पगाराची आतुरतेने वाट पाहात असते. पण कल्पना करा, की पगार खात्यात पडला आणि काहीच मिनिटांत तो संपूर्ण खर्च झाला, तर काय होईल? ही गोष्ट आता कुणा एका व्यक्तीची नाही, तर असंख्य लोकांची आहे. विशेषतः मध्यमवर्गीय नागरिकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढत्या खर्चामुळे बचत घटली आहे आणि लोक कर्जाच्या सापळ्यात अडकत चालले आहेत.