Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

Gold ETF: गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर झपाट्याने वाढले असून, त्यात गुंतवणूक करणारेसुद्धा संधीचा फायदा घेत आहेत. गुंतवणूक प्रत्यक्ष सोने खरेदीपुरती मर्यादित राहिली नसून इतर पर्यायांनाही पसंती दिली जात आहे.
Why should you consider investing in gold through ETFs
Why should you consider investing in gold through ETFsSakal

पुणे: गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर झपाट्याने वाढले असून, त्यात गुंतवणूक करणारेसुद्धा संधीचा फायदा घेत आहेत. गुंतवणूक प्रत्यक्ष सोने खरेदीपुरती मर्यादित राहिली नसून इतर पर्यायांनाही पसंती दिली जात आहे. त्यात अग्रस्थान गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडला (ईटीएफ) आहे. गेल्या काही वर्षांपासून हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय बनला असून, सध्या त्याची चलती आहे.

गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी तसेच हौस म्हणून सोने घेण्यास अनेकांची पसंती असते. गुंतवणूक विश्वासार्ह ठरत असल्याने सोन्याचे दर वाढत असले तरी खरेदी कमी झालेली नाही. मात्र आता प्रत्यक्ष सोन्याची खरेदी केली जात नाही. ज्वेलर्सकडे ठेवी ठेवून खरेदी, भिशी, डिजिटल अशा अनेक पर्यायांना पसंती मिळत आहे.

Why should you consider investing in gold through ETFs
Godrej Family Split: गोदरेजमध्ये फूट! 127 वर्षे जुन्या ग्रुपमध्ये झाल्या वाटण्या; कोणाला काय मिळाले?

गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करून एक प्रकारे सोनेच खरेदी करतात. मात्र हे सोने प्रत्यक्षात आपल्याला घरी घेऊन येता येत नाही. त्यासाठी तुमच्याकडे डिमॅट अमाउंट असणे आवश्यक असते. गोल्ड र्इटीएफ शेअर बाजारात ट्रेड होते. यात गुंतवणूक करण्याची प्रक्रिया शेअर बाजारातील गुंतवणूक करण्यासारखीच आहे. आपण सोयीनुसार गोल्डचे युनिट्स खरेदी करू शकतो.

''सोन्याची खरेदी किती विश्वासार्ह हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा सोन्यावर विश्वास आहे. त्याची आता विविध स्वरुपांतून खरेदी केली जात आहे. गेल्या काही वर्षांत गोल्ड ईटीएफला अनेकांचा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक कायद्यामुळे गुंतवणूकदार या पर्यायाचा विचार करीत आहेत.''

- अमित मोडक, कमोडिटीतज्ज्ञ व मुख्य कार्यकारी अधिकारी पीएनजी ॲण्ड सन्स

Why should you consider investing in gold through ETFs
Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

गोल्ड ईटीएफचे फायदे

  • युनिट्स स्टॉकप्रमाणे खरेदी करता येतात

  • प्रत्यक्ष सोन्याच्या तुलनेत खरेदीसाठी लागणारे खरेदी शुल्क कमी असते

  • १०० टक्के शुद्धतेची हमी

  • प्रत्यक्ष सोने खरेदी आणि देखभाल करण्याची कोणतीही अडचण नाही

  • दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा

  • एसआयपीद्वारे गुंतवणुकीची सुविधा

  • गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा कमी अस्थिर

  • गोल्ड ईटीएफ डिमॅट खात्याद्वारे ऑनलाइन खरेदी केले जाऊ शकतात

  • पाहिजे तेव्हा खरेदी आणि विक्री करता येते

  • कराच्या दृष्टीने ते प्रत्यक्ष सोन्यापेक्षा स्वस्त आहे.

  • भांडवली नफा गोल्ड ईटीएफवर भरावा लागतो

  • घडणावळ द्यावी लागत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com