

Why Stock Market Crash Today: आज 4 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 1% पेक्षा जास्त घसरले. जागतिक व्यापार युद्ध सुरू होण्याच्या भीतीने गुंतवणूकदार घाबरले आहेत. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. सेन्सेक्स 820 अंकांनी किंवा 1.07 टक्क्यांनी घसरून 75,475 वर आला.
निफ्टी 313 अंकांनी किंवा 1.35 टक्क्यांनी घसरला आणि 22,936 च्या पातळीवर पोहोचला. BSE लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सुमारे 8.5 लाख कोटी रुपयांनी घसरले. फार्मा, आयटी आणि मेटल शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली आहे.