
Gold Price Predict
Sakal
Gold Price Predict: नवरात्री सुरू झाली आहे आणि काहीच दिवसांत धनत्रयोदशी व दिवाळीही येणार आहे. भारतीय परंपरेनुसार या सणासुदीच्या काळात सोने-चांदीची खरेदी शुभ मानली जाते आणि बाजारातही त्यासाठी मोठी मागणी असते. पण या वर्षी परिस्थिती थोडी वेगळी आहे. प्रश्न असा निर्माण झाला आहे की, पुढच्या काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या किमती खाली येणार का, की सोनं थेट ₹1.5 लाख ते ₹2 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचेल? याच प्रश्नाचं उत्तर केडिया कॅपिटलचे संस्थापक आणि बाजार तज्ज्ञ अजय केडिया यांनी दिलं आहे.