
आजचे 1 कोटी रुपये 25 वर्षांनी केवळ 29.53 लाख असतील.
महागाईमुळे भविष्यात त्याच खर्चासाठी तब्बल 3.4 कोटी रुपयांची गरज भासेल.
योग्य गुंतवणूक आणि फायनान्शियल प्लॅनिंगशिवाय पैशाची किंमत टिकवणे अशक्य आहे.
Inflation Calculator: आज जर तुमच्याकडे 1 कोटी रुपये असतील, तर तुम्ही करोडपती आहात. तुम्ही म्हणाल की या पैशात मुलीचं लग्न थाटामाटात करता येईल, मुलांना परदेशात शिकवता येईल किंवा एखादं मोठं घर घेता येईल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की 25 वर्षांनंतर म्हणजेच 2050 मध्ये या 1 कोटी रुपयांची किंमत किती असेल? उत्तर ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल.