
PPF Interest Rate: तुम्ही तुमचे कुटुंब आणि मुलांच्या भविष्याचा विचार करुन PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी पाच वर्षांनंतर प्रथमच रेपो रेटमध्ये कपात केली आहे.
यानंतर, सरकार पुढील आर्थिक वर्षात पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या लहान बचत योजनांवरील व्याजदरात कपात करू शकते. अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचे दर प्रत्येक तिमाहीत सरकारकडून बदलले जातात किंवा स्थिर ठेवले जातात.