
Wipro Layoffs Again : विप्रोमध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात; आता 'इतक्या' कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ
IT Firm Wipro Layoffs : भारतासह जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रातील कर्मचारी कपात सुरूच आहे. रोज कुठली ना कुठली कंपनी लोकांना कामावरून काढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या कालावधीत अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. आता आणखी एक IT कंपनी विप्रो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.
विप्रोने जवळपास 120 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या कर्मचारी कपातीचा प्रभाव भारतात होणार नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 120 यूएस कर्मचार्यांनी नोकरी गमावली आहे. (Wipro Layoffs IT Firm Sacks 120 Employees in US Due to Realignment of Business Needs)
आयटी कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की नोकरी शोधणार्यांमध्ये 100 हून अधिक प्रोसेसिंग एजंट आहेत. टीम लीडर आणि टीम मॅनेजरलाही हटवण्यात आलं आहे.
अहवालात असे म्हटले आहे की, ही कपात केवळ एका विशिष्ट क्षेत्रात करण्यात आली आहे, ज्यामुळे उर्वरित अमेरिकन कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
या कर्मचाऱ्यांना कधी कामावरून काढणार :
कंपनी उर्वरित कर्मचाऱ्यांच्या कपातीचा विचार करत नसल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. मे महिन्यातच या कर्मचाऱ्यांची कपात सुरू होईल. आता त्यांना नोटीसचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. या काळात कंपनी पगार आणि इतर गोष्टी देईल.
अर्ध्या पगारावर नोकरीत रुजू होण्याची ऑफर :
कंपनीने नुकतेच फ्रेशरच्या पगारात निम्म्याने कपात केली होती आणि त्यांना अर्ध्या पगारावर नोकरीवर रुजू होण्यास सांगितले होते. बंगळुरू येथील मुख्यालयासाठी ज्या कर्मचाऱ्यांना वार्षिक 6.5 लाख रुपये पगाराची ऑफर देण्यात आली होती. नंतर त्यांना कंपनीत साडेतीन लाख रुपये वार्षिक पगारावर रुजू होण्याची ऑफर देण्यात आली.
अनेक टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात :
गेल्या काही महिन्यांतील मंदीमुळे अनेक टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. डेल कंपनीने 6,650 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे.
त्याच वेळी, दिग्गज कंपनी Google ने जानेवारी 2023 पासून आतापर्यंत एकूण 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. याशिवाय ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा, मायक्रोसॉफ्ट यांनीही कर्मचारी कपात केली आहे.