
ईडीएलआय योजनेअंतर्गत आता किमान 50,000 रुपयांचा विमा लाभ हमखास मिळणार, पीएफ खात्यातील शिल्लक रकमेची अट रद्द.
दोन नोकऱ्यांमधील जास्तीत जास्त 60 दिवसांचा ब्रेक नोकरीत खंड मानला जाणार नाही.
पगार बंद झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत मृत्यू झाल्यासही कुटुंबीयांना विमा रक्कम मिळणार.
PF Account: कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) कर्मचारी जमा लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) योजनेत मोठे बदल केले आहेत. नव्या नियमांमुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना थेट फायदा होणार आहे, विशेषतः जेव्हा कुटुंबातील कमावणारा सदस्य नोकरीदरम्यान निधन पावतो तेव्हा कुटुंबीयांना विमा रक्कम मिळणार आहे.