
WPI Inflation In India: उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे डिसेंबरमध्ये घाऊक महागाई दर 2.37% पर्यंत वाढला आहे. तर नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई दर 1.89% होता. मात्र, खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या आहेत. किरकोळ महागाई दर या कालावधीत 5.22% पर्यंत घसरला, जो नोव्हेंबरमध्ये 5.48% होता.