

Petrol Price Today: Stability Now, But Is a Price Shock Coming?
eSakal
Petrol-Diesel Rate in Maharashtra: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे. युद्ध सुरू होण्याआधी $75 प्रति बॅरेल असणारा दर सध्या $109 प्रति बॅरेल एवढा झाला. मात्र हे दर वाढले असले तरी भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे साधारण दर सध्या स्थिर ठेवण्यात आले आहेत. अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर तेलाचे दर वाढले असून ब्रेंट क्रूड सुमारे 109 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे.