

petrol diesel
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता भारतात बसू लागल्या आहेत. कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असल्यानं भारतातील इंधन तेलाच्या दरात वाढ केली जात आहे. गेल्या १० दिवसात भारतात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालीय. पेट्रोलियम कंपन्यांनी चार वर्षानंतर १५ मे रोजी इंधन तेलाच्या दरात वाढ केली. त्यानंतर १० दिवसात आतापर्यंत चार वेळा कमी अधिक प्रमाणात दर वाढवण्यात आलेत. Petrol Diesel Become Costlier Amid Middle East Crisis