

PFRDA NPS Exit Rule Change
ESakal
जर तुम्ही तुमची निवृत्ती सुरक्षित करण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने NPS एक्झिट नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. सरकारने आता तुम्हाला तुमचे स्वतःचे पैसे वापरण्याचे अधिक स्वातंत्र्य दिले आहे. ज्यामुळे निवृत्तीनंतर तुमचे खिसे भरलेले राहण्यास मदत होईल.