

PM Kisan 22nd Installment Update: ₹2,000 Stuck for 30 Lakh Farmers, Big Statement in Parliament
eSakal
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Update: भारत सरकारची शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी प्रमुख योजना म्हणजे पीएम-किसान योजना. आतापर्यंत यात 21 हप्ते BDT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात आले असून शेतकरी सध्या 22 व्या हप्त्याची वात पाहत आहे. मात्र काही शेतकऱ्यांसाठी हा हप्ता अडचणीचा ठरू शकतो.
कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अजूनही 30 लाखांपेक्षा अधिक शेतकरी आधार क्रमांक आणि बँक खाते जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकलेले नाहीत. ही जोडणी (सीडिंग) न झाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही, त्यामुळे अनेक पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.