

Money Management After Celebrations
Sakal
मराठीत ‘संतुलन’ या शब्दाचा अर्थ समतोल किंवा स्थिरता असा होतो. जिथे वस्तू किंवा व्यक्तींचे वजन, जोर किंवा प्रभाव समान असतो आणि कोणतीही बाजू अधिक वजनदार नसते. हे भौतिक किंवा मानसिक दोन्ही संदर्भात वापरले जाऊ शकते; जसे की शरीरातील समतोल राखणे किंवा विचारांमध्ये स्थिरता ठेवणे. विचारांतील ही स्थिरता आर्थिक बाबतीत राखली, तर त्यालाच ‘आर्थिक संतुलन’ म्हणतात. नुकतीच दिवाळी होऊन गेली आहे. अनेकांनी मनसोक्त खरेदी केली आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन काहीसे गडबडले असेल. दिवाळीनंतर किंवा अशा सणसमारंभानंतर आपले आर्थिक स्वास्थ्य असंतुलित होऊ नये, यासाठी आधीच काही नियोजन करणे गरजेचे आहे.