
Responsible thinking
E sakal
लेखक - श्रीकांत जाधव
मनुष्याच्या संपूर्ण सभ्यतेचा पाया हा विचारात दडलेला आहे. विचार केवळ निरीक्षणापुरते मर्यादित नसतात, ते वास्तवाचा शोध घेतात आणि नव्या जगाची निर्मिती घडवतात. जॉन मिल्टन म्हणतो, “मन हे स्वतःचेच जग आहे; स्वतःच्या सामर्थ्याने ते नरकाला स्वर्ग, आणि स्वर्गाला नरक करून टाकते.” या वाक्यात विचारांची ताकद, त्यांच्या सर्जनशीलतेची आणि विध्वंसकतेची दोन्ही रूपं अधोरेखित होतात. मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळं करणारी खरी देणगी म्हणजे विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि विश्वाला नव्याने घडवण्याची त्याची क्षमता. या क्षमतेमुळेच तो गुहेतून बाहेर आला, महासागर पार करत गेला, अवकाश जिंकण्याचे धाडस केले. सभ्यता उभारणारे आणि नष्ट करणारे एकच साधन असेल, तर ते म्हणजे विचार.