Premium|Pradhan Mantri Jan Dhan Yojana : प्रधानमंत्री जन-धन योजनेचा १२ वर्षांचा तपप्रवास; आर्थिक सर्वसमावेशनातून ‘जन-धन’ची तपपूर्ती

Jan Dhan Yojana and Financial Inclusion : प्रधानमंत्री जन-धन योजना ही केवळ सरकारी योजना न राहता देशातील प्रत्येक व्यक्तीला वित्तीय प्रणालीशी जोडणारी व्यापक राष्ट्रीय मोहीम आणि आर्थिक परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग बनली.
Pradhan Mantri Jan Dhan Yojana

Pradhan Mantri Jan Dhan Yojana

esakal

Updated on

पुरुषोत्तम बेडेकर - psbedekar२१@gmail.com

प्रधानमंत्री जन-धन ही केवळ सरकारी योजना नाही, तर एक राष्ट्रीय मोहीम आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती वित्तीय प्रणालीचा भाग असली पाहिजे, या उद्देशाने या महत्त्वाकांक्षी योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. विविधांगी योजनांच्या माध्यमातून ‘जन-धन’ खाते हे स्वतंत्र उत्पादन न राहता एका व्यापक आर्थिक परिसंस्थेचा महत्त्वाचा हिस्सा बनले आहे. ‘जन-धन’च्या तपपूर्तीनिमित्त घेतलेला आढावा...

भारताच्या बँकिंग इतिहासात २८ ऑगस्ट २०१४ रोजी काहीतरी वेगळेच घडले. या दिवशी देशात केवळ एका सरकारी योजनेचा नव्हे, तर एका राष्ट्रीय मोहिमेचा प्रारंभ झाला. देशातील प्रत्येक व्यक्ती वित्तीय प्रणालीचा भाग असली पाहिजे, या उद्देशाने ‘प्रधानमंत्री जन-धन योजने’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.

एक छोटीशी सुरुवात...

महाराष्ट्रातील एका खेड्यात राहणाऱ्या लक्ष्मीने अनेक महिने घरखर्चातून पैसे वाचवून २००० रुपयांची बचत केली होती. लक्ष्मी आणि तिचा पती महेश शेतामध्ये काम करतात. त्यांचे बँक खाते नव्हते. तिने आपली बचत एका पत्र्याच्या डब्यामध्ये जपून ठेवली होती. आजारपण आले किंवा अन्य आर्थिक संकट उभे राहिले, तर सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. एके दिवशी त्यांच्या खेड्यात बँक मित्र रमेश आला. त्याने लक्ष्मी आणि महेश यांना बँकेत बचत खाते उघडण्याचा सल्ला दिला. ‘‘कशाला? आमच्याकडे इतके पैसे नाहीत,’’ लक्ष्मीने विचारले.

‘‘तुमच्यासाठीच तर भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये खात्यामध्ये कोणतीही किमान रक्कम ठेवावी लागत नाही. तुम्ही तुमची छोटी-छोटी बचत बँक खात्यामध्ये जमा करू शकता आणि गरजेच्या वेळी काढू शकता,’’ बँक मित्राने समजावून सांगितले. अखेरीस लक्ष्मीने तिचे पहिले बँक खाते उघडले आणि आपली २००० रुपयांची बचत खात्यात जमा केली. त्या वेळी तिलाही वाटले नव्हते, की हे एका मोठ्या आर्थिक प्रवासाचे पहिले पाऊल ठरणार आहे. लक्ष्मी आणि तिच्यासारख्या कोट्यवधी महिलांच्या आर्थिक जीवनात होणाऱ्या बदलांची नांदीच प्रधानमंत्री जन-धन योजनेद्वारे झाली. ज्या व्यक्तींची बँक खाती यापूर्वी कधी उघडलीच गेली नव्हती, अशा व्यक्तींना शोधून त्यांची खाती उघडण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com