

Pre-Wedding Financial Planning
esakal
आजकाल लग्नापूर्वी फोटोसेशन म्हणजे प्री-वेडिंग फोटोसेशन करण्याची हौस केली जाते, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. ही हौस करताना आयुष्याच्या गणितालादेखील थोडा वेळ द्या आणि आपले विवाहोत्तर आयुष्याचा ताळेबंद पक्का करा! ज्याच्यासोबत आयुष्यभराची गाठ बांधायची आहे, त्याच्याशी आर्थिक बाबींवरही चर्चा करणे आवश्यक आहे. आर्थिक सुरक्षिततेमुळे वैवाहिक आयुष्य सुकर होण्यासही मदत होईल.