Prime Ministers and Stock Market Performance
esakal
निरंजन दांडेकर - niranjandandekar2007@gmail.com
सप्टेंबर महिना उजाडला, की राजकीय आणि आर्थिक वर्तुळाचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाकडे लागते. वयाची ७६ वर्षे पूर्ण करत असताना दलाल स्ट्रीटपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत एका अनुत्तरित प्रश्नाची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे, २०२९ नंतर कोण? मोदींनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली, तर भारतीय शेअर बाजाराचे काय होईल? त्यांच्या आधीच्या पंतप्रधानांच्या काळात शेअर बाजाराने कोणत्या घटनेत कशी प्रतिक्रिया दिली, पंतप्रधानपदी येणे किंवा त्या पदावरून पायउतार होणे यांचा शेअर बाजारावर खरेच काही परिणाम होतो का, अशा अनेक पैलुंचा उहापोह इतिहासातील दाखल्यांवरून मिळतो. त्याचा वेध घेत पंतप्रधानांचा कालावधी आणि शेअर बाजाराची स्थिती याचा घेतलेला धांडोळा मांडण्याचा येथे प्रयत्न केला आहे.