
"Homebuyers celebrate as new projects and housing schemes make dreams of ownership come true."
Sakal
-डॉ. दिलीप सातभाई, चार्टर्ड अकाउंटंट- सीए
वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) सुसूत्रीकरणामुळे केवळ निवासी आणि व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रच नव्हे, तर बांधकाम, पायाभूत सुविधा आणि सेवा क्षेत्रांनाही ‘अच्छे दिन’ येणार आहेत. एवढेच नव्हे, तर मध्यमवर्गीयांना घरखरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही हा सुवर्णकाळ आहे. कारण महागाईमुळे होणारी भाववाढ ही नित्याचीच झाली आहे, त्यामुळे घर खरेदी महाग होत असून, पुढेही भविष्यात किमती वाढणारच आहेत. मात्र, जीएसटीमुळे करकपात झाल्याने दसरा-दिवाळी सणाच्या कालावधीत घर खरेदीदारांच्या इच्छा पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे, त्यामुळे घरांची मागणी भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे.